वेदीं जैसा वर्णिला ।
573.
वेदीं जैसा वर्णिला । तैसा विटेवरी देखिला ॥१॥
पुराणे सांगती ज्या गोष्टी । तो विटेवई जगजेठी ॥२॥
शास्त्रें वेवादती पाही । तोचि विटे समपाई ॥३॥
न कळे न कळे आगामां निगमाहीं । न कळे सीमा ॥४॥
जाला अंकित आपण । एका जनार्दनी शरण ॥५॥
