वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ५. सार्थ अभंग २००१ ते २५००

आपुला तो देह आम्हा उ

🙏 3. संत तुकाराम · ABH-078170 · अभंग क्र. २१५२

2152.
आपुला तो देह आम्हा उपेक्षीत । कोठे जाऊ हित सांगो कोणा ॥१॥
कोण नाही दक्ष करिता संसार । आह्मी हा विचार वमन केला ॥धृपद॥
नाही या धरीत जीवित्वाची चाड । कोठे करू कोड आणिकाचे ॥२॥
तुका म्हणे असो चिंतोनिया देवा । मी माझे हा हेवा सारूनिया ॥३॥

अर्थ :
अहो जेथे आम्ही आमच्या देहाची उपेक्षा केली तेथे आम्ही दुसऱ्याला हित सांगण्यासाठी कोठे जाऊ? आपला संसार दक्षतेने चांगला करावा याविषयी कोण तत्पर नाही परंतु आम्ही तर आमचा संसार ओकुन टाकला आहे. अहो येथे मीच माझ्या जिवित्वा चि आवड पूर्ण करत नाही त्याची आवड करत नाही तर इतरांचे कोडकौतुक कोठे करत बसु. तुकाराम महाराज म्हणतात आता मी आणि माझे हा हेवा दूर सारुन केवळ देवाचे चिंतन करायचे आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग