यावरी पुढील कार्यार्
158.
यावरी पुढील कार्यार्थु ।
साधावया श्रीकृष्णनाथु ।
चालिले राजभुवना आंतु ।
तव दारवंटा समस्त मल्ल उभे ॥१॥
म्हणती कोठे रे करुनिया मेळ ।
चालिला ते अवघे गोवळ ।
नेणोनिया राजाज्ञा बळ ।
जैसे टोळ सैराट ॥२॥
पाठवा पुढे कृष्ण तोचि ।
आणील परवानगी तो रायाची ।
तव गोवळ म्हणती रे हे वायाची ।
जल्पता मराल येचि क्षणी ॥३॥
परवानगीये एकचि ठावो ।
बळिराम अथवा कृष्णदेवो ।
सांडूनिया कंसरावो ।
रिघा रे शरण वांचाल ॥४॥
तव ते म्हणती ही कच्ची पोरे ।
चणचणा बोलती न्यायनिष्ठुरे ।
भयचि ही गव्हारे ।
आपटा एकदोनी धरुनिया ॥५॥
त्यांचिया कैवारा कृष्णनाथ ।
येईल आपोआप धावत ।
मग करुनिया वरवळा समस्त ।
त्यासीहि वधू निमिषार्धे ॥६॥
निळा म्हणे चिंतुनी ऐसे ।
घांविले गोवळांवरी अति आवेशे ।
तव ते ओढिले नांगरपाशे ।
बळिरामे एकदांचि कवळिने ॥७॥
