देव गुज सांगे पंढरीस
442.
देव गुज सांगे पंढरीसी यारे । प्रेमे चित्ती घ्यारे नाम माझे ॥१॥
काया वाचा मन दृढ धरा जीवी । सर्व मी चालवी भार त्यांचा ॥२॥
भवसिंधु तारीन घ्यारे माझी भाक । साक्ष पुंड-लिक करूनि बोले ॥३॥
लटके जरी असे नामयासी पुसा । आहे त्या भरंवसा नामी माझ्या ॥४॥
