नित्य प्रेमाचे पेटे
441.
नित्य प्रेमाचे पेटे बांधी माझे पोटी |उतरी जगजेठी पैलपार ॥१॥
निरे भिवरे ऐक्य तीरी |का पद्मळा पंढरपुरी ॥२॥
केलिया रविवारी आंघोळी |महादोषा होय होळी ॥३॥
पाप जाईल जन्माचे |पद पावाल अच्युताचे ॥४॥
म्हणाल बोलणे कोणाचे |नामया स्वामी केशवाचे ॥५॥
