उपमन्युकथा - अभंग ३४
3444.
उपमन्युकथा - अभंग ३४४४ ते ३४५१
होऊनि सावधान चित्ता । उपमन्यूची कथा । एका भावे ऐकता । सायुज्यता पाविजे ॥१॥
उपमन्यु मागितले । देवे तयासी दिधले । ते सांगेन वहिले । चित्त देऊनी परियेसा ॥२॥
ब्राम्हणासी पुत्र झाला । पित्यासी हर्ष वाटला । थोर कष्टे वाढविला । स्नेहो आशा धरुनी ॥३॥
बाळक तो जाणता । पित्यासी उपजली चिंता । एका जनार्दनी तत्वता । वचनार्थ परिसावा ॥४॥
