वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 125. उपमन्युकथा - अभंग ३४४४ ते ३४५१

मातेसी म्हणे बाळ । द

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084129 · अभंग क्र. ३४४५

3445.
मातेसी म्हणे बाळ । दूध पिती मुलें सकळ । मजही दूध तात्काळ । माते देई भोजना ॥१॥
मग ते करड्या वांटूनी । जननी काढी शुभ्र पाणी । बारे दूध म्हणोनी । वाटीयें भात कालविला ॥२॥
तंव शेजारीं ब्राम्हणें श्राध्द केले । तयाचिया घरां जेवावया नेलें । बरवे उत्तम पक्वान्न वाढिलें । नानापरी भोजना ॥३॥
बाळासी वाढिली दूध क्षीरी । ते जेविलें पोटभरी । एका जनार्दनी निर्धारी । गेले आपुल्या गृहासी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग