वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 193. मागणे

मनुष्य करिसी तरी झाड

🙏 4. संत नामदेव · ABH-082559 · अभंग क्र. १७४२

1742.
मनुष्य करिसी तरी झाडफेडी मिसे | परी तुझे द्वारी वसे ऐसे करी ॥१॥
पक्षि करिसी तरी चारियाचनि मिसे | परी तुझे द्वारी बसे ऐसे करी ॥२॥
झाड करिसी तरी तुळसीचेनि मिसे | परी तुझे द्वारी बसे ऐसे करी ॥३॥
वृक्ष करिसी तरी मंडपाचेनि मिसे | परी तुझे द्वारी वसे ऐसे करी ॥४॥
श्वान करिसी तरी उच्छिष्टाचेनि मिसे | परी तुझे द्वारी बसे ऐसे करी ॥५॥
पाषाण करिसी तरी पायरीचेनि मिसे | परी तुझे द्वारी वसे ऐसे करी ॥ ६ |
उदक करिसी तरी सडियाचेनि मिसे | परी तुझे द्वारी बसे ऐसे करी ॥७॥
नामा म्हणे मज कीर्तनाचेनि मिसे | परी तुझे द्वारी वसे ऐसे करी ॥८॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग