चला बाई वृंदावनीं रा
168.
चला बाई वृंदावनीं रासक्रीडाम पाहुं । नंदाचा बाळ येणे केला नवलाऊ ॥१॥
कल्पनेची सासु इचा बहुताचि जाचु । देहभाव ठेऊनी पाया ब्रह्मापदीं नाचुं ॥२॥
सर्व गर्व सोडूनी बाई चला हरेपाशीं । द्वैतभाव ठेवुनी पायी हरिरुप होसी ॥३॥
एका जनार्दनी विश्वव्यापक हा देव । एक एक पाहता अवघे स्वप्नवत वाव ॥४॥
