जैसा केला तैसा होय आ
167.
जैसा केला तैसा होय आपोआप । संकल्प विकल्प न धरी कांही ॥१॥
न म्हणे उंच नीच यातीकुळ । वर्ण व्यक्ति शील न पाहेची ॥२॥
उच्छिष्ट ते प्रिय गौळियांचे खाये । हमामा हुंबरी नाचतसे घाये ॥३॥
एका जनार्दनी सांडोनिया थोरपणा । खेळतांही न्युन न बोले कांही ॥४॥
