सोळा सहस्त्र गोपी भो
2116.
सोळा सहस्त्र गोपी भोगुनी बह्माचारी । ऐशी अगाध कीर्ति तुमची श्रीहरी ॥१॥
दीन आम्ही रंक वंदितों चरणा । सांभाळी दीनांलागीं मानसमोहना ॥२॥
एका जनार्दनी धन्य धन्य लाघव । एकरुपें असोनी दिसो नेदी कैसे वैभव ॥३॥