वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 45. पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९

भाव धरुनी शरण येती ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087280 · अभंग क्र. ४६६

466.
भाव धरुनी शरण येती । तया मोक्ष सायुज्यप्रांप्ती । ऐसी वेद आणि श्रुती । गर्जतसे सादर ॥१॥
म्हणोनी न करा आळस । सुखे जा रे पंढरीस । प्रेम कीर्तनाचा रस । सुखें आदरे सेविजे ॥२॥
पाहता नीरा भीवरा दृष्टी । स्नाने वास त्या वैकुंठीं । पुर्वजही कोटी । उद्धरती सर्वथा ॥३॥
एका जनार्दनी सांगे । भाक दिधली पांडुरंगे । धन्य संचित जे भाग्य । तेंचि योग्य अधिकारी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग