देशाविरहित काळासी अत
465.
देशाविरहित काळासी अतीत । ते देवभक्त पंढरीये ॥१॥
जाऊनिया कोणी पहा । देवाधिदेव विठोबासी ॥२॥
जन्ममरणाचे तुटतील फांसे । पाहता उल्हासें देवभक्तां ॥३॥
एका जनार्दनी विटेवरी निधान । लेवुनी अंजन उघडें पहा हो ॥४॥