मागणीचे माझ्या तुज क
669.
मागणीचे माझ्या तुज का साकडे ।
पडले येवढे सांग देवा ॥१॥
मागीतले तरी कायसे अघोर ।
म्हणोनिया थोर चिंता तुज ॥२॥
भेटी देता भीती तुज काय वाटे ।
तेणे भये कोठे लपालासी ॥३॥
बहिणी म्हणे भ्याडा, अगा पुरूषोत्तमा ।
काय ही उपमा तुज साजे ॥४॥
