वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

तयासीच आम्ही म्हणो थ

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-075942 · अभंग क्र. ६६८

668.
तयासीच आम्ही म्हणो थोर जाणा ।
जयासी करूणा पराविया ॥१॥
छत्रपती राजा स्वये म्हणवितो ।
सोयरा मागतो भीक त्याचा ॥२॥
जाळावे ते काय त्याचे थोरपण ।
कृपणासमान कृती ज्याची ॥३॥
बाईल उघडी फिरतसे घरी ।
भूषण बाहेरी काय त्याचे ॥४॥
बहिणी म्हणे फुका म्हणविसी उदार ।
परी अनुदार वृत्ति तुझी ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग