काय वेचे सांग भेटि द
670.
काय वेचे सांग भेटि देता तुझे ।
म्हणोनिया ओझे तुज वाटे ॥१॥
काय तुझे रूप नेईन चोरोनी ।
भये चक्रपाणि लपालासी ॥२॥
काय तुज तोटा येईल बोलता ।
अगा दीनानाथा पांडुरंगा ॥३॥
काय काज आम्हा तुझीये वैभवा ।
आस ही केशवा भेटीची गा ॥४॥
बहिणी म्हणे आम्हा नलगे तुझे काही ।
भेटीवीण पाही दीनबंधो ॥५॥
