येऊनिया यम ठाकला पुढ
577.
येऊनिया यम ठाकला पुढारीं| पाहे दुराचारी दुरोनिया ॥१॥
घाबरला मनी कोण असे नेणे| विचारिता मनी भांबावला ॥२॥
पुसो लागे त्याला कोण तू आलासी| आणिक म्हणसी माग काही |॥३॥
देव किंवा यक्ष राक्षस किन्नर | करिता निर्धार न पड़े ठायी ॥४॥
नामा म्हणे मूर्ख पारधी तो खरा| दैव त्याच्या घरा आले जाण ॥५॥
