(श्री ज्ञानेश्वर महा
3395.
(श्री ज्ञानेश्वर महाराजांनी पाठवविलेल्या धरणेकऱ्यास उपदेश व तुकारामम हाराजांनी त्याला देवाचे वर्णन केलेले अभंग महाफळ म्हणून नारळ रूपाने दिले परंतु त्याने ते न घेता तसेच टाकून तो ब्राह्मण निघून गेला. )
सुखे खावे अन्न । त्याचे करावे चिंतन ॥१॥
त्याचे दिले त्यासी पावे । फळ आपणासी फावे ॥धृपद॥
आहे हा आधार । नाम त्याचे विश्वंभर ॥२॥
नाही रिता ठाव । तुका म्हणे पसरी भाव ॥३॥
अर्थ :
अन्नाची उत्पत्ती करणाऱ्या देवाचे अन्न आपण जसे सुखाने खातो तसेच त्या देवाचेही चिंतन सुखाने करावे. देवाचे घेतलेले देवालाच दिले तरच आपल्याला फळप्राप्ती होते. संपूर्ण विश्वाचा हा आधार आहे त्यामुळे तर त्या देवाला विश्वंभर नांव दिले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, जगामध्ये देवावाचून कोणताही पदार्थ रिकामा नाही त्यामुळे तुझा भक्तीभाव तू व्यापक कर आणि सर्वभूती तू हरी आहे असाच दृढ भक्तीभाव ठेव.
