वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › ४, नाममाला > अभंग ११० ते १५५

राम नाम वाट हेचि पै

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-075056 · अभंग क्र. ११६

116.
राम नाम वाट हेचि पै वैकुंठ ।
ऐसी भगवतगीता बोलतसे स्पष्ट ॥
अठरा साक्षी साही वेवादत ।
चौघांचेनि मते घेईन भागु ॥
शेवटिले दिवसी धरणे घेईन ।
बापरखुमादेविवरा बळे चि साधीन ॥

अर्थ :
श्रीमत् भगवतगीता स्पष्ट सांगते की श्रीरामाचे नाम हीच वैकुंठाची वाट आहे अठरा पुराणे साही शास्त्र व चार वेद यांचेही तेच मत आहे म्हणून मी सतत रामनाम घेईन. रखमाईचे पती व माझे पिता यांचे नाम माझ्या अंतःकाळापर्यत अट्टाहासाने घेईन व त्या बळावर त्या परमात्म्याला आपलासा करुन घेईन असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग