वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › ४, नाममाला > अभंग ११० ते १५५

कर्म आणि धर्म आचरती

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-075051 · अभंग क्र. ११७

117.
कर्म आणि धर्म आचरती जयालागी ।
साधक सिणले साधन साधिता अभागी ॥
गोड तुझे नाम विठोबा अवडते मज ।
दुजे विचारिता मना वाटतसे लाज ॥
भुक्ती आणि मुक्ति नामपाशी या प्रत्यक्ष ।
चारही वेद साही शास्त्रे देताती साक्ष ॥
काया वाचा चित्त चरणी ठेविलेसे गाहाण ।
बापरखुमादेविवरा विठ्ठलाची आण ॥

अर्थ :
परमात्म्याच्या प्राप्तीसाठी अभागी साधक कर्म व धर्म आचरताना शिणून गेले. हे विठ्ठला तुझे गोड नाम मला खूप आवडते व दुसऱ्या साधनाचा विचार करण्याची मला लाज वाटते. चारी वेद व सहा शास्त्र साक्ष देतात की भक्ती आणि मुक्ती या नामापाशीच आहेत. रखमादेवीचे पती व माझे पिता विठ्ठल याच्या चरणी काया वाचा व चित्त गहाण ठेवले आहे असे माऊली शपथ पूर्वक सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग