असत्य परपंच म्हणऊनि
123.
असत्य परपंच म्हणऊनि सांडिसी ।
नागवण परियेसी तेही तुज ॥१॥
असत्येचि सत्य साधला जाणिजे ।
विवेक पाहिजे आपुलिया ॥२॥
असत्य शरीर तयाचेनि जाण ।
साधिती निर्वाण ब्रह्मनिष्ठ ॥३॥
सोहागी असत्य परी एकवटी सोने ।
लोखंड भूषणे घडवितसे ॥४॥
नाग तो विखार सेविता तो हित ।
महाविष मृत्यु न बाधती ॥५॥
बहेणि म्हणे सत्य आत्येचि साधे ।
सद्गुरूचे बोधे वर्तलिया ॥६॥
