साधनांची आटाआटी ।
29.
साधनांची आटाआटी ।
कासया पाठी लाविता ॥१॥
एक तुमचे नामचि पुरें ।
हेंचि धुरे साधन ॥२॥
भाळी-भोळी करीन सेवा ।
माना देवा, तुम्ही धन्य ॥३॥
सांवता म्हणे रुक्मिणीवरा ।
अहो अवधारा वचन माझे ॥४॥
29.
साधनांची आटाआटी ।
कासया पाठी लाविता ॥१॥
एक तुमचे नामचि पुरें ।
हेंचि धुरे साधन ॥२॥
भाळी-भोळी करीन सेवा ।
माना देवा, तुम्ही धन्य ॥३॥
सांवता म्हणे रुक्मिणीवरा ।
अहो अवधारा वचन माझे ॥४॥