वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

नेणे गाऊ काही धड बोल

🙏 3. संत तुकाराम · ABH-079431 · अभंग क्र. ३९८६

3986.
नेणे गाऊ काही धड बोलता वचन । कायावाचामनेसहित आलो शरण ॥१॥
करी अंगीकार नको मोकलू हरी । पतितपावन ब्रिदे करावी खरी ॥धृपद॥
नेणे भक्तिभाव तुझा म्हणवितो दास । जरि देसी अंतर तरि लज्जा कोणास ॥२॥
म्हणे तुकयाबंधु तुझे धरियेले पाय । आता कोण दुजा ऐसा आम्हासी आहे ॥३॥

अर्थ :
देवा मला स्वरामध्ये गाता येत नाही, धड नीट शब्दही काही बोलता येत नाही पण मी कायावाचामने सहीत तुला शरण आलो आहे. हे हरी तू माझा अंगीकार कर मला मोकलू नकोस तुझे पतितपावन हे ब्रीद तू खरे करावेस. देवा भक्तिभाव कसा करावा हे मी जाणत नाही तरी पण तुला मी शरण आलो आहे स्वत:ला तुझा दास म्हणून घेत आहे आणि असे असून देखील सुध्दा तू जर मला अंतर देत असशील तर त्याची लाज कोणाला आहे ? तुकाराम महाराजांचे बंधु कान्होबा म्हणतात की, देवा आम्ही तुझे आता पाय धरले आहे आणि आम्हाला प्रेम देणारा तुझ्यावाचून दुसरा कोणी येथे आहे काय ते तू सांग ?

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग