अंबा ३९१९ ते ३९२१
3919.
अंबा ३९१९ ते ३९२१
नमो अनादिमाया भगवती । मुळपीठनिवासीनी स्वये ज्योती अविनाशीनी । जगदंबे मायेंउभी राहे ॥१॥ तु ते पहावया दृष्टी । हरिहर ब्रह्मातप करिती । तरी त्यासी नव्हे तुझी प्राप्ती । तुंप्रत्यक्ष येथे प्रगटलिसी । बया उभी रहाये ॥२॥ आली रे आली भवानी भवानी आली ॥धृ.॥ तिशीसिध्द आसन देऊनी । बरवी पुजा करुनी । वरीखेळणा पाळणा टांगोणी । पुजिली अविनाश भवानी ॥३॥ समसाम्य समान । अढळ तुझे सिंहासन । सच्चिदानंदासी गादी जाण । तेथे सुखासन मैं तुझे॥४॥पावावया तुझी प्राप्ती । साधनचतुष्टय संपत्तीजोडोनिया याचक योजिती । प्रत्येका नीतीचेनीयोगे।५॥जेमजहोमीतीसाधनीं । ऐसे भक्त भजनदेखुनीं । तेणे भावार्थयोग संतोषोनी । निजपद दानी -तुंहोसी ॥६॥तुंते करावया प्रगट । ते सर्वही झालेपोचट । मग होती तो सर्व अदृष्ट । अंबा स्वयंभप्रगटली॥७॥त्यास होमाची परी । सांगोनियांअवधारीं । यज्ञमंडप कुसरी । अभिनव लहरीउठलिसें ॥८॥ तेथे विधान करावेंदत्तात्रयाची । बाहेरमेखळा त्रिगुणांची । आंत मुर्ति जगदंबेची । आव्हानिली ॥९॥ येथे ॐकार षटकार । बीजात्मकनाम मनोच्चार । द्रव्य अपी अपार । अति पवित्रअवदानी ॥१०॥ दश इंद्रिया आदि आहुति । मनासहित दिधली निश्चीती । अहंकार मेंढा बळीदेऊनी पुर्णआहुती । आई भवानी तोषविली ॥११॥ मोह महिषासुराचा करावया घात । अंबा कडाडोनिदांत खांत । तोधाकचि निमाला निश्चीत । पुर्णानंदप्रगटला ॥१२॥तुझा गोंधळी नेटका । बळीराम महासखा । तेणे आत्मनिवेदन करुनी देखा । तुजलागींमायें उभे केले ॥१३॥ एका जनार्दनी निर्धारी । अखंड पुंडलीकाचे द्वारी । दोन्ही चरण विटेवरी । जोडोनी निर्धारी उभी राहे ॥१४॥
