वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 148. तीर्थावळी

तीर्थयात्रेप्रति बोळ

🙏 4. संत नामदेव · ABH-081596 · अभंग क्र. ९२०

920.
तीर्थयात्रेप्रति बोळविला नामा | आले निजधाम देवरावो ॥१॥
चरण प्रक्षाळाया रुक्मादेवी आली | श्रीमुख न्याहाळी भरोनी दृष्टी ॥२॥
तै निडारले नयन स्वेदे भिजले वदन | हृदय जाले पूर्ण करुणारसे ॥३॥
बाप कृपेचा सागरु सुखाचा सुखतरु | आर्त लोभापरु दीनालागी ॥४॥
चरणी ठेवुनी माथा पुसे जगन्माता | आजी का अवस्था विपरीत देखो ॥५॥
म्हणे वाटते जडभारी नाम्याच्या वियोगे | दाटले उद्वेगे चित्त माझे ॥६॥
कवण्या सुखे स्थिर न राहे माझे मन | कै डोळा देखेन प्राण माझा ॥७॥
इष्टमित्र बंधु मायबाप सखा | ही नामे मज देखा ठेविली तेणे ॥८॥
तो कैसा मजवीण राखिल आपुला प्राण | हे चिंता दारुण वाटे मज ॥९॥
तव ती महामाया म्हणे जी यादव राया | झणी तुमच्या नामया दिठी लागे ॥१०॥
शोक मोह दुःख क्षणामाजी जाळी | ते जीवन त्याजवळी नाम तुमचे ॥११॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग