वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 148. तीर्थावळी

माझे भक्त मज अनुसरले

🙏 4. संत नामदेव · ABH-081572 · अभंग क्र. ९२१

921.
माझे भक्त मज अनुसरले चित्ते | त्याहुनि पढियंते मज आणिक नाही ॥१॥
व्यक्ती येणे घडे त्याची या आवडी | युगायुगी प्रौढि हेचि मिरवी ॥२॥
त्याचेनि कृतार्थ असे मी पूर्णकाम | ते माझे परम प्राणसखे ॥३॥
ते माझे आश्रम मी त्यांचा विश्राम | जीही रूपनाम केले मज ॥४॥
मी त्यांचा सोयरा ते माझे सांगाती | करी त्यांसी एकांति सुखगोष्टी ॥५॥
जीही तनुमन प्राण लाविला मजकडे | मी तया आवडे जीवाहुनि ॥६॥
ते माझ्या भाग्याचे अधिकारी विभागी | वैकुंठ त्या लागी वसते केले ॥७॥
त्यांचे गुज गौप्य मीची एक जाणे | माझी प्रेमखूण कळली तया ॥८॥
मनाची साउली करोनिया माते | भोगिती आता ते प्रेमसुख ॥९॥
आपुलियाची किरणे विराजे गभस्ती | परी किरणे ती नव्हती आन जेंवी ॥१०॥
तैसे माझे दास मजमाजी उदास | असती समरस दुजेनविण ॥११॥
मी तो भक्तरूप भक्त माझे स्वरूप | प्रभा आणि दीप जयापरी ॥१२॥
हे खूण अनुभवी जाणती ते ज्ञानी | ज्या नाही आयणी कासयाची ॥१३॥
त्यांचिये चरणीचे रजरेणु माझे नामे | जे सांडिले रजतमे सत्वशीळ ॥१४॥
त्यांचे भेटीलागी हृदय माझे कळवळे | कै देखेन डोळे निवती माझे ॥१५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग