वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

आणिक आईक अकरावा जन्म

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076197 · अभंग क्र. १६३

163.
आणिक आईक अकरावा जन्म ।
प्रवरासंगम गंगातीर ॥१॥
तेथे माध्यंदिन ब्राह्मण तो भला ।
वास तेथे केला गंगातीरी ॥२॥
अयाचित वृत्ती आलियासी अन्न ।
घालितसे जाण यथाकाळी ॥३॥
गोकर्ण हे नाम तयाचे उत्तम ।
शांति दया धर्म क्षमादिक ॥४॥
तयाची वल्लभा भली पतिव्रता ।
सगुणाद्भुता नाम तिचे ॥५॥
तयांचिये पोटी होऊनिया कन्या ।
नाम हे सौजन्या ठेवियेले ॥६॥
साता वरूषावरी केले कन्यादान ।
पाहोनी निधान अतिज्ञानी ॥७॥
अत्यंत विरक्त योगाभ्यासी ज्ञान ।
घालोनी आसन योग साधी ॥८॥
नाम की तयाचे योगेश्वर ऐसे ।
सिद्धी त्या मानसी वोळंगल्या ॥९॥
सेवेनी तयासी तोषविले बहू ।
त्याचा माझा जीऊ एक झाला ॥१०॥
सांगितले मज योगाचे आसन ।
धरूनिया ध्यान खेचरीचे ॥११॥
गुरू तो भ्रतार सर्वस्व आमुचा ।
घेतले सेवेचे सुख तेथे ॥१२॥
गुरू बंधू पुत्र सांगाती मागील ।
तू होसी कैवल्य जन्मोजन्मी ॥१३॥
क्रमोनिया तेथे वर्षे त्रेचाळीस ।
राहिला हव्यास ब्रह्मनिष्ठे ॥१४॥
बहेणि म्हणे आता जन्म तो बारावा ।
सांगेन धरावा हृदयामाजी ॥१५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग