वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

तुझे मनोगत जाणोनी अं

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-075933 · अभंग क्र. १६४

164.
तुझे मनोगत जाणोनी अंतरी ।
बोलिले वैखरी जन्म नाना ॥१॥
ऐक बा बारावा सांगेन तातडी ।
मृत्यूची हे थोडी वेळ आहे ॥२॥
लाखणी हे स्थळ अगाधचि तोये ।
लक्ष तीर्थे पाहे तये स्थळी ॥३॥
शिवनद पाहे औट नदांतील ।
संगमीचे स्थळ महा उग्र ॥४॥
तेथे अनुष्ठानी होता एक द्विज ।
नाम तया सहज रामचंद्र ॥५॥
तयाची वल्लभा जानकी पवित्र ।
तया घरी पुत्र दोघे होती ॥६॥
थोर ब्रह्मज्ञानी शांतीचा आगर ।
तीर्थांचे माहेर तीर्थरूप ॥७॥
तयाचिय पोटी कन्येचिया रूपे ।
होउनिया तपे साधियेली ॥८॥
धरूनिया मौन वर्ततसे जनी ।
बोलती वचनी वाचा नसे ॥९॥
करोनिया लग्न दिधलेसे ब्राह्मणा ।
ज्योतिषी जो जाणा महाथोर ॥१०॥
तयासी प्रसन्न गणेश प्रत्यक्ष ।
बोलतसे साक्ष तयासी तो ॥११॥
तयाचिये गेही निराहार देही ।
सेवासुख पाही घेतले म्या ॥१२॥
विरक्त मानस विषयभोगी त्रास ।
सदा निजध्यास आत्मनिष्ठा ॥१३॥
रामचंद्र पिता राम-उपासक ।
अत्यंत विवेक ज्ञान तया ॥१४॥
माझे अंतरीचा जाणोनिया हेत ।
केले माझे चित्त स्थिर तेणे ॥१५॥
लाउनी समाधी बैसवी सन्निध ।
अंतरी तो बोध ठसावला ॥१६॥
स्वधर्म गौरव देउनिया पती ।
सेवा आत्मस्थिती करी त्याची ॥१७॥
कोठे चित्त अणुमात्रही न बैसे ।
सदा निजध्यासे देह वर्ते ॥१८॥
पडिले शरीर छत्तिषा वरूषात ।
व्हावे परी मुक्त शेष राहे ॥१९॥
बहेणि म्हणे जन्म बारावा तो ऐसा ।
तेराव्याची दशा सांगिजेल ॥२०॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग