करूनि आरती । आता ओवा
4007.
करूनि आरती । आता ओवाळू श्रीपती ॥१॥
आजि पुरले नवस । धन्य काळ हा दिवस ॥धृपद॥
पाहा वो सकळा । पुण्यवंता तुम्ही बाळा ॥२॥
तुका वाहे टाळी । होता सन्निध जवळी ॥३॥
अर्थ :
आता आरती करुन श्रीपतीला ओवाळू. आज नवस पूर्ण झाला असून आजचा काळ व दिवस धन्य आहे अहो सर्व पुण्यवंतांनी बाळरुप हरीला पाहा. तुकाराम महाराज म्हणतात, मी तेथेच अगदी देवाच्या जवळ उभा राहून टाळी वाजवीत होतो.
