वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

(दसरा)

🙏 3. संत तुकाराम · ABH-079346 · अभंग क्र. ४००६

4006.
(दसरा)
पवित्र सुदिन उत्तम दिवस दसरा । सापडला तो साधा आजि मुहूर्त बरा ।
गर्जा जयजयकार हरी हृदयी धरा । आळस नका करू लाहाना सांगतो थोरा ॥१॥
या हो या हो बाइयांनो निघाले हरी । सिलंगणा वेगी घेउनि आरत्या करी ।
ओवाळू श्रीमुख वंदू पाउले शिरी । आम्हा दैव आले येथे घरिच्या घरी ॥धृपद॥
अक्षय मुहूर्त औटामध्ये साधे ते । मग येरी गर्जे जैसे तैसे होत जाते ।
म्हणोनि मागे पुढे कोणी न पाहावे येथे । सांडा परते काम जाऊ हरी सांगाते ॥२॥
बहुता बहुता रीती चित्ती धरा हे मनी । नका गै करू आइकाल ज्या कानी ।
मग हे मुख कधी न देखाल स्वप्नी । उरेल हायहाय मागे होईल काहाणी ॥३॥
ऐसियास वंचता त्यांच्या अभाग्या पार । नाही नाही नाही सत्य जाणा निर्धार ।
मग हे वेळ घटिका न ये अजरामर । कळले असो द्या मग पडतील विचार ॥४॥
जयासाठी ब्रम्हादिक जालेति पिसे । उच्छिष्टा कारणे देव जळी जाले मासे ।
अर्धांगी विश्वमाता लक्षुमी वसे । तो हा तुकयाबंधु म्हणे आले अनायासे ॥५॥

अर्थ :
आजचा दिवस अगदी पवित्र चांगला व उत्तम आहे कारण आज दशइंद्रियांचा दसरा हा चांगला मुहूर्त सापडला आहे. त्यामुळे तुम्ही हरीनामाचा जयजयकार करावा व हरीला हृदयात धारण करा. हरीनाम घेण्यास आळस करु नका असे मी सर्व लहान व मोठया लोकांना सांगतो आहे. अहो सर्व प्रकृतीच्या स्वाधीन असलेल्या बायांनो तुम्ही या, तुम्ही लवकर या कारण हरी सीमोल्लंघन करण्यासाठी निघाले आहेत त्यामुळे हरीची आरती करण्यासाठी तुम्ही त्वरेने या. आता हरीच्या श्रीमुखाला ओवाळून त्याच्या पावलावर मस्तक ठेवून त्याला वंदन करु आमचे दैव आयते ये

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग