संतांचे सन्निध पालटे
213.
संतांचे सन्निध पालटे संचित ।
नवी सृश्टी होत क्षणे एके ॥१॥
ऐसे जाण संत अगाध गुणांचे ।
कायामनेवाचे शरण होय ॥२॥
संतांचे वचनी भनुतेजवृष्टी ।
दर्भा-अग्री सृष्टी ठेवियेली ॥३॥
बहेणि म्हणे संत जै होती कृपाळ ।
तैच पर्वकाळ येती घरा ॥४॥
