संत ते सोयरे जिवलग स
1513.
संत ते सोयरे जिवलग सांगाती । भेटतां पुरती सर्व काम ॥१॥
कामधेनु कल्पतरु चिंतामणी । उदार चुडामणी याहुनी संत ॥२॥
देऊं परिसाची यासी उपमा । परी ते अये समा संताचिये ॥३॥
एका जनार्दनी संतांचा सांगात । पुरती सर्व आर्त जीवींचें जे ॥४॥
