नामदेवा हाती स्वये द
290.
नामदेवा हाती स्वये दूध प्याला । अपमान केला बादशहाचा ॥१॥
करिता कीर्तन देऊळ फिरविले । प्रत्यक्ष दाविले अवंढ्यासी ॥२॥
अक बरे गाय वत्स मारियेल । किर्तनी उठविले नामदेवे ॥३॥
परिसा भागवते परिस पै दिधला । राजाईने ठेविला आपणापासी ॥४॥
तयालागी वाळुवंटी परिस केले । अज्ञान निरसिले परिसीयाचे ॥५॥
चोखा म्हणे ऐसी कृपेची माउली । आम्हा ती वोळली जन्मोजन्मी ॥६॥
