वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 22. संत चोखामेळा, चोखोबाराय › 1. संत चोखामेळा अभंग गाथा › १. संत चोखामेळा अभंग गाथा ३५८ › १२. भक्तवत्सलता

पाहा नामयाचे घरी । स

🙏 22. संत चोखामेळा, चोखोबाराय · ABH-075255 · अभंग क्र. २९१

291.
पाहा नामयाचे घरी । सेट्या होऊन धान्य भरी ॥१॥
गोष्टी बोले राजाईसी । सांगू नका नामयासी ॥२॥
विठ्ठल सेटी नाम माझे । कोठे बोलू नका वोजे ॥३॥
ऐस बोलोनी तियेसी । देव आले राऊळासी ॥४॥
नामा घरासी जो आला । पाहोनि बोले गोणाईला ॥५॥
आजि दिसतो नवलाव । सकळ सुखाचे वैभव ॥६॥
गोणाई म्हणे विठ्ठल सेटी । धान्य घेऊनी गोणी लोटी ॥७॥
नामा हांसे आपुले मनी । वेगी धांवे हे ब्राह्मणी ॥८॥
बोलावोनी ब्राह्मणासी । धान्य वांटिले तयांसी ॥९॥
ऐसा नवलाव देखोन । चोखा घाली लोटांगण।
॥१०॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग