भक्तकृपाळू माउली ।
399.
भक्तकृपाळू माउली ।
कटी कर उभी ठेली ॥१॥
मोहे पाहे मुखाकडे ।
भेटावया वाडे कोडे ॥२॥
परम प्रीतीचा वोरस ।
सदांसर्वदां उल्हास ॥३॥
निळा म्हणे सुप्रसन्न ।
भक्तांलागी हास्यवदन ॥४॥
399.
भक्तकृपाळू माउली ।
कटी कर उभी ठेली ॥१॥
मोहे पाहे मुखाकडे ।
भेटावया वाडे कोडे ॥२॥
परम प्रीतीचा वोरस ।
सदांसर्वदां उल्हास ॥३॥
निळा म्हणे सुप्रसन्न ।
भक्तांलागी हास्यवदन ॥४॥