वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › ९. पंढरीमहात्म्य व पांडुरंगाचे वर्णन

वसवूनिया चराचर ।

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088504 · अभंग क्र. ३९८

398.
वसवूनिया चराचर ।
उभा नागर विटेवरी ॥१॥
सगुण रुपे भासे लोका ।
परि हा नेटका निरामय ॥२॥
दैत्यातकचि म्हणती यासी ।
परि हा सकळांसी भक्षक ॥३॥
भक्तांपाशी गुंतला दिसे ।
परि हा वसे अणुरेणी ॥४॥
कर्ता भोक्ता वाटे सकळा ।
परि हा वेगळा अलिप्त ॥५॥
निळा म्हणे नयेचि मना ।
करिता विवंचना श्रुतिशास्त्रांसिही ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग