तुमचा भरंवसा धरोनी म
15.
तुमचा भरंवसा धरोनी मानसी । दृढ पायांसी शरण आले ॥१॥
आता कळेल तो करावा विचार । मी आपुला भार उतरिला ॥२॥
मांडीवरी मान ठेविली संपूर्ण । पुढील कारण जाणोनिया ॥३॥
निर्मळा म्हणे तारा अथवा मारा । तुमचे तुम्ही सारा वोझे आता ॥४॥