हरीदासाचिये घरी । मज
3222.
हरीदासाचिये घरी । मज उपजवा जन्मांतरी ॥१॥
म्हणसी काही मागा । हेचि देगा पांडुरंगा ॥धृपद॥
संता लोटांगणी । जाता लाजो नको मनी ॥२॥
तुका म्हणे अंगी । शक्ती देई नाचे रंगी ॥३॥
अर्थ :
देवा जन्मजन्मांतरी मला हरीदासांच्याच घरी जन्म दयावे. हे पाडूरंगा तुम्ही जर मला म्हणत असताल की काहीतरी मला माग तर मला एवढेच तुम्ही दयावे. अहो देवा संतांना मी लोटांगणी जात असताना माझ्या मनामध्ये लाज येऊ देऊ नका. तुकाराम महाराज म्हणतात, देवा मी नाम रंगात नाचो अशी शक्ती माझ्या अंगात तुम्ही दयावी.
