वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

लटिक्याचे आंवतणे जेव

🙏 3. संत तुकाराम · ABH-080621 · अभंग क्र. ३२२३

3223.
लटिक्याचे आंवतणे जेविलिया साच । काय त्या विश्वास तोचि खरा ॥१॥
कोल्हांटिणी लागे आकाशी खेळत । ते काय पावत अमरपद ॥धृपद॥
जळमंडप्याचे घोडे राउत नाचती । ते काय तगती युद्धालागी ॥२॥
तुका म्हणे तैसे मतवादीयांचे जिणे । दिसे लाजिरवाणे बोलताचि ॥३॥

अर्थ :
नेहमी खोटे बोलणाऱ्या माणसाने आपल्याला जेवणाचे आमंत्रण दिले तर ज्यावेळी तो आपल्याला जेवू घालील त्यावेळीच त्याचे बोलले खरे समजावे कारण तो नेहमी खोटे बोलतो त्यामुळे त्याचा विश्वास कसा धरावा ? कोल्हाटीण उंच तारेवर नाचण्याचा खेळ खेळते म्हणून तिला काही इंद्रपद मिळणार आहे काय ? अहो आपल्याला आकाशामध्ये घोडे नाचल्यासारखे शिपाई, असल्यासारखे ढगे दिसतात मग ते युध्दामध्ये काही टिकणार आहे काय ? तुकाराम महाराज म्हणतात, अगदी त्याप्रमाणे चार्वाकादी मतवादयांचे जगणे आहे अहो ते नुसते बोलले जरी तरी त्यांचे बोलणे लाजिरवाणे असल्याचे दिसून येते.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग