वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 7. संत निवृत्तीनाथ › 1. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा › १. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४ › १. संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा

जेथे नाही वेदु नाही

🙏 7. संत निवृत्तीनाथ · ABH-090106 · अभंग क्र. १५२

152.
जेथे नाही वेदु नाही पै शाखा । द्वैताचा हा लेखा हरपला ॥१॥
ते रूप वोळले नंदायशोदे सार । वसुदेवबिढार भाग्ययोगे ॥२॥
नमाये पुरत ब्रह्मांडाउभवणी । त्यालागी गौळणी खेळविती ॥३॥
निवृत्ति ब्रह्मसार सेवितुसे सोपे । नामे पुण्यपापे हरपती ॥४॥

अर्थ:
जेथे चारी वेदांना व श्रुती, स्मृती सारखा त्यांच्या शाखाना त्याचे वर्णन जमले नाही. ते वर्णन करण्याची त्यांची शक्तीच हरपली.ते साररुप परब्रह्म वसुदेवाच्या कुटुंबात जन्मले व नंद यशोदेला पुत्र म्हणुन मिळाले. ज्याने ब्रह्मांडे निर्मिले त्याचे माप करण्यास सगळी मापे थोकडी आहेत त्याला त्या गौवळणी सहज अंगावर खेळवतात. निवृतिनाथ म्हणतात, हे त्या कृष्णनामाचे सहज सोपे सार असुन त्याच्या नामामुळे पाप पुण्य दोन्ही हरपतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग