वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 7. संत निवृत्तीनाथ › 1. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा › १. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४ › १. संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा

विश्वी विश्वपती असे

🙏 7. संत निवृत्तीनाथ · ABH-089986 · अभंग क्र. १५१

151.
विश्वी विश्वपती असे पै लक्ष्मीनाथ । आपणचि समर्थ सर्वांरूपी ॥१॥
ते रूप गोकुळी नंदाचिये कुळी । यशोदे जवळी बाळकृष्ण ॥२॥
सर्वघटी नांदे एकरूपसत्ता । आपणचि तत्त्वता सर्वांरूपी ॥३॥
निवृत्तीचे पार कृष्णचि पै सार । गोकुळी अवतार नंदाघरी ॥४॥

अर्थ:
लक्ष्मीचा पती असलेला परमात्माच ह्या विश्वाचा आधिपती असुन तोच सर्वरुपानी समर्थ आहे. तोच परमात्मा गोकुळात, नंदाच्या कुळात यशोदेचा बाळ कृष्ण आहे. आपणच जगताच्या सर्व रुपात अंशात्मक असल्याने त्याच्या रुपाने जगात एकत्मता आहे. निवृत्तिनाथ म्हणतात, गोकुळात नंदाघरी अवतरलेल्या कृष्णाचे नाम हे माझे सार आहे व तेच मला पार करणार आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग