अद्वैताची झडपणी ब्रह
666.
अद्वैताची झडपणी ब्रह्मी निमाली ।
तन्मय तत्त्वता ब्रह्मींच मुराली ॥१॥
परतोनी पाहणे परतोनी पाहणे ।
नाही त्या ठाया जाणे रुपेंवीण ॥२॥
बापरखुमादेविवरु रुपेंवीण देखिला ।
आटकु ठाकला द्वैताकारे रया ॥३॥
अर्थ :
ज्या पुरुषाला अद्वैत आत्मबोधाने झडपले आहे. तो बोध आणि तन्मयत्व ही ब्रह्माच्या ठिकाणीच मुरतात. ज्या ब्रह्मस्वरुपाच्या ठिकाणी वृत्ति पोहोचली असता पुन्हा मागे परतून पहाण्यास शिल्लक राहात नाही. त्याठिकाणी जाणे म्हणजे आपले स्वतःच्या नामरुपाचा परित्यागच करणे होय. असे माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल परमात्मा नामरुपावांचून मी पहिला म्हणून द्वैताकार जगत् प्रतितीचा प्रतिबंध निवृत्त झाला. असे माऊली सांगतात.
