वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › ४, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६०२ ते ७०१

पाहता वटाचा विस्तारु

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074344 · अभंग क्र. ६६७

667.
पाहता वटाचा विस्तारु कैसा ।
शाखा फुटलिया कळिया तैसा ॥१॥
सांगाल पै ते काय जाले ? ।
वटविस्तार दोही हरपले ॥२॥
विशुद्धचक्री मेरु हा नेडे ।
तेथे परदीपी साहित्य जोडे ॥३॥
बापरखुमादेविवरा विठ्ठला ।
मनोमानसी तया सामावला ॥४॥

अर्थ :
वडाच्या झाडाचा विस्तार पाहू गेले तर त्याच्या शाखा, फांद्या, डाहाळ्या कळ्या वगैरे मोठ्या असतात. परंतु एवढा विस्तार अत्यंत सूक्ष्मबीजाचा होता. तेव्हा हा विस्तार काय झाला ते सांगा पाहू. विचार करु गेले असता. वड आणि त्याचा विस्तार हे दोन्ही बीजांत नाहीसे होऊन जातात. त्याप्रमाणे अत्यंत शद्ध जो परमात्मा त्याचे ठिकाणी 'हा मेरु' म्हणजे संसार 'नडे' म्हणजे गुप्त रुपाने राहतो. त्याचा पुन्हा विस्तार होण्याला परमात्मस्वरुपाच्या प्रकाशाची सहाय्यता होते. हा सर्व संसार माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल त्यांचे मनांत सामावून गेला आहे, असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग