वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › ४, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६०२ ते ७०१

नादबिंद कळा ज्योति स

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074339 · अभंग क्र. ६६५

665.
नादबिंद कळा ज्योति स्वरुपी विलया जाती ।
श्रुति नेति नेति म्हणती जेथे ॥१॥
नाही मज चाड सकळ उपाधी ।
एका मंगळनिधी वांचूनिया ॥२॥
श्रीरामी रमता मनु निवडीता नये तनु ।
सुखश्री सांगता सिणु हारतु असे ॥३॥
पदापिंडा दाटणी रुपानिरुपा निरंजनी ।
विठ्ठलाचरणी ज्ञानदेवो ॥४॥

अर्थ :
नाद, विद्, कळा ज्योति ही सर्व परब्रह्माच्या ठिकाणी लय पावतात. आणि आठिकाणी श्रुतिसुद्धा नेति नेति म्हणून माघारी फिरतात. असा परममंगळ निधी श्रीविठ्ठलच आहे. त्याच्यावाचून मला कोणत्याही उपाधिची आवड नाही. श्रीरामाच्या ठिकाणी रमलो असता शरीर किंवा मन याची निवड करता येत नाही. जे दोन्ही एकरुपच होतात. त्या श्रीरामाच्या सुखाचा अनुवाद करीत असता सर्व साराच्या दुःखाचा शीणभाग नाहीसा होऊन जातो. निरुप जे निरंजन पद त्याच्या ठिकाणी शरीराची किवा नामरुपाची आटणी होऊन श्रीविठ्ठलाचे चरणी मी रममाण झालो. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग