पतिव्रता सती उठोनि स
3458.
पतिव्रता सती उठोनि सकाळी । शेजारिणी सदनीं येती जाहली ॥१॥
अहो माते पती जाती कृष्ण दरुशना । कांही तरी धान्य देई मज ॥२॥
ऐकोनिया ऐसे पतिव्रतेचें वचन । जाहलें समाधान चित्त तेणे ॥३॥
एका जनार्दनी हरिकृपा पूर्ण । पोहे दिले जाणा तीन मुष्टी ॥४॥
