ऐकोनिया कांतेचें वचन
3457.
ऐकोनिया कांतेचें वचन । चित्तसमाधान सुदाम्याचे ॥१॥
म्हणतसे भेटी रिक्तहस्तें नवजावें । हा शास्त्राचा प्रवाहो भाष्य असे ॥२॥
देव द्विज गुरु या तिघांचे दरुशन । रिक्तपणें जाण न घ्यावें जी ॥३॥
एका जनार्दनी करुनी विचार । भेटीचा निर्धार बाणलासे ॥४॥
