तीन शते आणि वरूषे एक
173.
तीन शते आणि वरूषे एकावन्न ।
आयुष्य निर्माण तेरा जन्मी ॥१॥
घातले स्त्रीरूपे साधने हरीच्या ।
निमाल्या मनाच्या वृत्ती जव ॥२॥
आता निश्चयाने सांगेन निर्धार ।
जाले निर्विकार चित्त माझे ॥३॥
बहेणि म्हणे पुढे काही नाही हेत ।
स्वरूपी निवांत चित्त माझे ॥४॥
