हा देह जोवरी आहे तुझ
174.
हा देह जोवरी आहे तुझा जाण ।
तोवरी तूज्ञान साधिसील ॥१॥
यापुढे तुज जन्म होती श्रेष्ठ ।
होसी योगभ्रष्ट जन्म नाना ॥२॥
तीन जन्म तुझे काशी-क्षेत्र-वास ।
वैराग्यमानस होतील ॥३॥
एक तू जन्मसी संन्यासी नेमस्त ।
चित्त काही स्वस्थ होय तेथे ॥४॥
पाचविये जन्मी अठरा वर्षा तुज ।
विदेहत्व पूज्य होसी खरा ॥५॥
तयापुढे जन्म घेणे नाही कदा ।
सांगतसे धंदा नको आता ॥६॥
बहेणि म्हणे तुझे जाणवेल तुज ।
कृपा करे बुझ गुरू-खुणे ॥७॥
