हेच तो प्रमाण जन्मास
172.
हेच तो प्रमाण जन्मासी कारण ।
अनुभव खूर हेचि आम्हा ॥१॥
ऐसे जाणूनिया हेत निर्दाळिला ।
अद्वय तो जाला हेत चित्ता ॥२॥
इंद्रिया जाणोनी दिले प्रायश्चित्त ।
ज्ञानमहातीर्थ आत्मनिष्ठा ॥३॥
विषयवासना भोगिली बहुकाळ ।
तयाचे निर्मूळ आजि केले ॥४॥
सद्गुरूवचनी धरूनिया निष्ठा ।
वासना त्या भ्रष्ट्या शुद्ध केल्या ॥५॥
बहेणि म्हणे मना दिले प्रायश्चित्त ।
आता जाले मुक्त आत्मबोधे ॥६॥
