ठांईहूनि जाती उखळे उ
59.
ठांईहूनि जाती उखळे उडताती । मस्तकी पडताती येवोनिया ॥१॥
पाटे वरवंटे वसुपात्रालागी । जीव त्या प्रसंगी येता झाला ॥२॥
घाबरे दुर्जन पळाया पाहत । आडव्या ठाकत बाजा पुढे ॥३॥
जानवे तुटले पंचांग फाटले । धोतरही गळाले ढुंगणाचे ॥४॥
पृष्ठीवरी होती बदबदा मार । तेथून सत्वर पळता झाला ॥५॥
आयुष्याची बाकी कांही उरली होती । ह्मणोनी श्रीपति सोडी त्याते ॥६॥
नामा ह्मणे जीव घेऊनि पळाला । मथुरेसी आला कंसापाशी ॥७॥
